21 January 2021

News Flash

अनिल कपूर- अनुराग कश्यप यांच्यात जोरदार ट्विटर-वॉर

एकमेकांना सुनावले खडेबोल, वाचा काय आहे प्रकरण?

अभिनेते अनिल कपूर व निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक चकमक रंगली. अनिल कपूर यांनी ‘दिल्ली क्राइम’ या वेब सीरिजला आंतरराष्ट्रीय ‘एमी’ पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद व्यक्त केला. याबद्दलचं ट्विट करताना त्यांनी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातील त्यांची सहकलाकार शेफाली शाह हिचं कौतुक केलं. इथूनच वादाला सुरुवात झाली.

काय आहे प्रकरण?

‘आपल्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळताना पाहून खूप आनंद होतो. दिल्ली क्राइमच्या टीमचं अभिनंदन’, असं ट्विट अनिल कपूर यांनी केलं. त्यावर त्यांना डिवचत अनुराग कश्यपने लिहिलं, ‘काही लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळतानाचं पाहताना मलाही आनंद होतो. पण तुमचा ऑस्कर पुरस्कार कुठे आहे? नाहीये का? अच्छा मग किमान नामांकन?’

यावर अनिल कपूर यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलं, ‘स्लमडॉग मिलेनिअर हा चित्रपट जेव्हा तुम्ही टीव्हीवर पाहिला असणार तेव्हा तुम्ही ऑस्कर पुरस्काराच्या किंचित जवळ आला होतात’, असं लिहित ‘तुम से ना हो पाएगा’ हा हॅशटॅग त्यांनी वापरला. अनुराग इथेच थांबला नाही. त्याने पुन्हा अनिल कपूर यांना खोचक टोला लगावला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी तुम्ही दुसरा पर्याय होता ना, असं त्याने ट्विट केलं. अनिल कपूर यांच्याआधी शाहरुख खानला चित्रपटातील भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यावरून अनुरागने हा टोला लगावला.

‘मला काही फरक पडत नाही. काम हे काम असतं. तुझ्यासारखं काम शोधताना मला किमान डोक्यावरचे केस तर उपटावे लागत नाहीत’. अशा शब्दांत अनिल कपूर यांनी अनुरागला सुनावलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 7:36 am

Web Title: anil kapoor and anurag kashyap twitter war over oscar ssv 92
Next Stories
1 आठ महिन्यांनंतरचा नाटय़प्रयोग तासात ‘हाऊसफुल्ल’!
2 अभिनेत्रीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला अटक
3 ‘राहूलशी ब्रेकअप कर’, असा सल्ला देणाऱ्या नेटकऱ्याला भडकली दिशा, म्हणाली…
Just Now!
X