News Flash

अनिल कपूरच्या ‘डान्स’वर बक्षीस जिंकण्याचा ‘चान्स’

अनिल कपूर चाहत्यांसाठी घेऊन आलाय आगळी वेगळी संधी

अभिनेता अनिल कपूर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या चाहत्यांना एक भन्नाट भेट दिल्याचे जाहिर केल्यनंतर सोशल मीडियावर अनिलचीच थट्टा झाल्याचे दिसतय. ‘वन टू का फोर…’ या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविणारा आणि आजही आपल्यातील तारुण्यपणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनिल कपूरने चाहत्यांना बक्षीस देणार असल्याचे जाहिर केले आहे. त्याच्या सारखे नृत्य करणाऱ्यास बक्षीस मिळणार असल्याचा एक व्हिडिओ खुद्द अनिल कपूरने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर केला. या व्हिडिओच्या माध्यमातून अनिल कपूरने चाहत्यांना त्याच्या सारखे नृत्य करुन दाखविण्याचे एका अर्थाने आव्हान दिले आहे.

माझ्या सारखे नृत्य करतानाचा व्हिडिओ तयार करुन वेबसाइटवर पाठविल्यास चाहत्यांना तो भेट देणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. एका वेबसाइटचा उल्लेख करत अनिल कपूरने नृत्य करण्याचे आव्हान केल्यानंतर अनिल कपूरच्या या व्हिडिओवर गमतीशीर प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसतय. अनिल कपूरसारखे नृत्य करणाऱ्याला जुन्या नोटा तर  भेट मिळणार नाहीत ना? असा प्रश्न एका नेटीझन्सने व्यक्त केलाय. नेटीझनने व्यवहारातून हद्दपार झालेल्या नोटांचा दाखला देत अनिल कपूर हा आता ज्येष्ठ अभिनेता झाला असल्याचे तर म्हणायचे नव्हते ना? असा प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतो. पण या नेटीझनने पुन्हा अनिल कपूर यांची लोकप्रियता असल्याचे मान्य केले. ‘तुमचा अंदाज सर्वांपेक्षा हटके असल्यामुळे तुमच्यासारखे नृत्य करणे कठीण असल्याचे सांगत त्याने अनिल कपूर यांना जूने पूराने संबोधण्याची आपली प्रतिक्रिया मागे घेतली. अनिल कपूरच्या व्हिडिओवर उमटलेली ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच लोकप्रिय झाल्याचे दिसते.लोक वेगवेगळ्या पद्धतीने अनिल कपूरच्या या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.

नुकतेच अनिल कपूरच्या नव्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. अनिल कपूरने स्वत: नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते. या जून्या अभिनेत्याचा नवा लूक आघाडीच्या कलाकारांना लाजविणारा असाच दिसला होता. त्याच्या चाहत्यांनी नव्या लूकला पसंती दिली होती. अनिल कपूर यांना सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर ही तीन मुले आहेत. मुले बॉलिवूडमध्ये आली तरी अनिल कपूरची जादू अजूनही बॉलिवूडमध्ये तशीच कायम आहे. त्याच्या तारुण्याची आज देखील बॉलिवूड वर्तुळात चांगलीच चर्चा रंगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:06 pm

Web Title: anil kapoor dance step chance win prize
Next Stories
1 ‘करार’बद्ध क्रांती-उर्मिलाने साधला लाइव्ह संवाद
2 डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा संताप अनुष्काला भावला
3 BLOG : आजही दादा कोंडके जोरात?.. होय!
Just Now!
X