News Flash

Video : जेव्हा रणवीरसोबत अनिल कपूर रॅम्पवरच धरतात ठेका

रॅम्पवर त्या दोघांना असं नाचताना पाहून जान्हवीलाही हसू अनावर झालं.

फॅशन जगतात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ला नुकतीच सुरुवात झाली आहे. लॅक्मे फॅशन वीक म्हटलं की सेलिब्रिटींच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. या शोमध्ये मोठमोठ्या फॅशन डिझायनर्सच्या कपड्यांचं शोकेसिंग मोठ्या दिमाखदार पद्धतीने केलं जातं. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार रॅम्पवॉक करतात. आतापर्यंत कंगना रणौत, अनिल कपूर, जान्हवी कपूर, रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, यामी गौतम यांसारख्या कलाकारांनी या शोमध्ये चार चाँद लावले. अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतो. यावेळी रॅम्पवरसुद्धा त्याचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

अनिल कपूर, रणवीर आणि जान्हवीने फॅशन डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी तयार केलेल्या कलेक्शनसाठी रॅम्पवॉक केला. पण हा रॅम्पवॉक इतर रॅम्पवॉकपेक्षा वेगळा ठरला तो म्हणजे रणवीरमुळे. रॅम्पवर रणवीरने अनिल कपूर यांना त्याच्यासोबत चक्क ठेका धरायला लावला. ‘झक्कास’ अभिनेता अनिल कपूरसुद्धा मग स्वत:ला रोखू शकले नाहीत. रॅम्पवॉक करून जान्हवी मागे वळताच रणवीर आणि अनिल कपूर यांनी नाचायला सुरुवात केली. रॅम्पवर त्या दोघांना असं नाचताना पाहून जान्हवीलाही हसू अनावर झालं.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सतत उत्साही असणाऱ्या रणवीरने अनिल कपूर रॅम्पवर येताच चिअरअप करणं सुरू केलं. मग रणवीरला पाहताच अनिल कपूर यांनीसुद्धा पुढे येऊन त्याला मिठी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 5:40 pm

Web Title: anil kapoor danced with ranveer singh on ramp watch this video lakme fashion week 2019
Next Stories
1 कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सेटवर परतली सोनाली बेंद्रे
2 ‘बाहुबली’मधल्या या अभिनेत्याला मिळाले हॉलिवूडचे तिकीट?
3 ‘उरी’ चित्रपटातील How’s The Josh डायलॉगबाबत विकी कौशल म्हणतो..
Just Now!
X