News Flash

लग्नाआधी अनिल कपूरच्या २५ गर्लफ्रेण्ड; अशी होती अनिल आणि सुनीता कपूर यांची पहिली भेट

अनिल कपूर आणि सुनिता कपूरची लव्ह स्टोरी

बॉलिवूडचा लखन म्हणजे अभिनेता अनिल कपूरने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. अनिल कपूरचं फिल्मी करिअर जितकं खास आहे. तितकीच खास त्यांची आणि सुनीता कपूर यांची लव्हस्टोरी आहे. अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या लग्नाला आज ३७ वर्ष पूर्ण झाली आहे. याचनिमित्ताने आपण अनिल कपूर आणि सुनीता यांच्या प्रेमकहाणी बद्दल जाणून घेणार आहोत.

लग्नाला ३७ वर्ष पूर्ण झाली असली तरी अनील कपूर आणि सुनीता याच्यातील प्रेम जराही कमी झालेलं नाही. अनील कपूर आणि सुनीताची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथानका प्रमाणेच आहे. अगदी पहिल्या नजरेतलं प्रेम ते विवाह आणि संसार असा त्यांचा प्रवास आहे. अनिल कपूर सुनीताला पहिल्यांदाच पाहता प्रेमात पडले होते. सुनीतापर्यंत पोहचण्यासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी अनिल कपूरला मोठी मेहनत घ्यावी लागली होती.

लग्नाआधी २५ मुलींना केलं होतं डेट
लग्नाआधी अनिल कपूरने अनेक तरुणींना डेट केलं होतं. अर्जुन कपूरला दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूरने या गोष्टींचा खुलासा केला होता. अगदी शाळेत असल्यापासूनच मजा-मस्ती करायला सुरुवात केल्याच तो या मुलाखतीत म्हणाला होता. तसचं आभ्यासात फार रस नसल्याने अनिल कॉलेजच्या कॅनटीनमध्येय जाऊन बसतं. तेव्हा त्याने ३-४ मुलींना डेट केलं होतं. ” त्यानंतर मी फिल्म इंडस्ट्रीत २०-२५ मुली गर्लफ्रेण्ड झाल्या. मात्र सुनीता सर्वात बेस्ट होती. ती माझी मैत्रीणही होती आणि मग आम्ही लग्न केलं” असं अनिल कपूरने या मुलाखतीत सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अशी झाली सुनीताशी भेट

२०१८ झाली दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूरने लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं होतं. अनिल कपूरच्या एक मित्राने एक प्रँक कॉल करून सुनीताचा नंबर दिला होता. अनिलने जेव्हा फोनवर सुनीताचा आवाज ऐकला तेव्हाच तो सुनीताच्या प्रेमात पडला. त्यानंतर एक पार्टीत दोघांची भेट झाली. मात्र तेव्हा अनिल एका दुसऱ्या मुलीला डेट करत होता. त्यामुळे सुनीताशी मैत्री होऊनही अनिल त्याच्या गर्लफ्रेण्डबद्दल सुनीताशी चर्चा करायचा. या मुलीने नंतर अनिलशी ब्रेकअप केलं. त्यानंतर सुनीता आणि अनिची जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमाचे रंग बहरू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

सुनीताच्या वाढदिवशी केली होती खास पोस्ट
अनिल कपूर यांनी सुनीता यांच्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने एक सुंदर पोस्ट लिहली होती. यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ” माझ्या आयुष्यातील माझ्या प्रेमासाठी.ट्रेनच्या तिसऱ्या डब्यातील प्रवासापासून लोकल बस, रिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीतील प्रवासापर्यंत, विमानाच्या इकोनॉमी सीटपासून बिझनेस क्लासच्या प्रवासापर्यंत, कराईकुडी गावातील कश्यातरी हॉटेलपासून लेहमधील तंबूत राहण्यापर्यंत, आपण चेहऱ्यावर आयम हसू ठेवून प्रेमाने हे सर्व एकत्र केलं आहे. अशा अनेक कारणांमधील ही काही कारणं आहेत ज्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करतो. ” अशी पोस्ट अनिल कपूर यांनी सुनीता यांच्या वाढदिवसानिमित्ताने लिहली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 4:30 pm

Web Title: anil kapoor had 25 girlfriends before get married with wife suneeta anil kapoor love story kpw 89
Next Stories
1 “तेव्हा वडिलांनाच मानलं होतं बॉयफ्रेण्ड”; एकटेपणाच्या संघर्षावर नीना गुप्ता यांचा खुलासा
2 लोकांचे जीव वाचवण्यासाठी दुसरं इंजेक्शन नाही का ?; सोनू सूदचा डॉक्टरांना सवाल
3 CID मधील या अभिनेत्याचा १७ वर्षांनी मोडला संसार, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला…
Just Now!
X