अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तुझं माझ्या आयुष्यात येणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी घटना आहे. आपला जीवन प्रवास हा एक खडतर प्रवास आहे. आता पर्यंतची डेटींगची ११ वर्षे आणि लग्नाची ३५ वर्षे अशी ४६ वर्षे आपण सोबत घालवली आहे. यापुढील  ४६ वर्षे तुझ्यासोबत एकत्र राहण्याची इच्छा आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुनिता कपूर! लव्ह यू’ असे अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले होते.

दरम्यान अनील कपूर यांची पत्नी सुनिता कपूर यांनी देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अनिल कपूर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या अनिल कपूर निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. तसेच हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.