04 March 2021

News Flash

Photo : अनिल कपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

काही दिवसापूर्वी बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळानंतर पंतप्रधानांची भेटी घेतली होती.

काही दिवसापूर्वी बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळात आलिया भट्ट, भूमी पेडणेकर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी, करण जोहर, वरूण धवन, एकता कपूर, राजकुमार राव, अश्विनी अय्यर अशा कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींचा समावेश होता. या भेटीमध्ये मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी, या क्षेत्राचं देशाच्या विकासातील योगदान यासारख्या अनेक विषयावर चर्चा झाली. या सेलिब्रिटींनंतर आता अभिनेता अनिल कपूर यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनिल कपूरने या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल कपूर एकमेकांसमोर बसलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये पंतप्रधानांची भेट घेतल्याचा आनंद अनिल कपूरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

‘आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मला मिळाली. त्यांची बोलण्याची पद्धत आणि उत्तम संवादकौशल्यामुळे मी प्रेरित झालो आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आपल्यावर आपोआप परिणाम होतो. पंतप्रधानांनी त्यांच्या अमुल्य वेळातून माझ्यासाठी उसंत घेत माझी भेट घेतली ही माझ्यासाठी फार मोठी बाब आहे आणि मी मनापासून त्यांचा ऋणी आहे’, असं अनिलने लिहीलं आहे.

दरम्यान, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या गाण्यावर आधारित अनिलचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अनिल व्यतिरिक्त सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला यांच्या मुख्य भूमिका आहेत. विधू विनोद चोप्रा यांची बहिण शैली चोप्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून हा एक रोमाँटिक चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 4:22 pm

Web Title: anil kapoor meets prime minister narendr modi
Next Stories
1 ‘…तर मराठी निर्मातेही करतील आत्महत्या’
2 Video : ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
3 पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटात अक्षय साकारणार खलनायक
Just Now!
X