News Flash

अनिल कपूर यांना अश्रू अनावर; म्हणाले, ‘तुझ्याशिवाय…’

पत्राव्दारे दिली ऋषी कपूर यांना आदरांजली

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अनिल कपूर यांनी बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत ऋषी कपूर आणि बोनी कपूर सुद्धा आहेत. या फोटोवर त्यांनी एक भावनात्मक पोस्ट लिहिली आहे.

“माझ्या प्रिय मित्रा जेम्स कुठून सुरुवात करु काही कळत नाही. आपलं नातं सख्या भावांसारखं होतं. आपण एकत्र वाढलो, खेळलो, धम्माल केली. जेव्हा कधी मला गरज होती, तेव्हा तू मला आधार दिलास. माझ्या पडत्या काळात तू माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिलास. तू मला कायम प्रोत्साहन दिलेस. माझी आई तुझे खूप लाड करायची, आणि तुझी आई माझे लाड करायची. कुठे गेले ते दिवस. आता तुझ्याशिवाय जगणं खरंच कठीण आहे. जेम्स तुझी खूप आठवण येईल. धन्यवाद माझ्या मित्रा.” अशा आशयाचे पत्र अनिल कपूर यांनी ऋषी कपूर यांना लिहिलं आहे.

अनिल कपूर यांनी पोस्ट केलेला हा फोटो काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर यांनी देखील पोस्ट केला होता. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 11:36 am

Web Title: anil kapoor on rishi kapoor passes away at 67 mppg 94
Next Stories
1 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज लीना भागवत व अमृता मोडक करणार कथांचं अभिवाचन
2 Video : ‘बघतोस काय मुजरा कर’; मराठमोळ्या कलाकारांच्या शुभेच्छा
3 नीतू कपूरच्या भावनांचा बांध फुटला; म्हणाल्या, ‘ते शेवटपर्यंत…’
Just Now!
X