News Flash

अक्षय कुमारचे बँक खाते आणि अमिताभ याच्या कपाटातील कपड्यांवर ‘या’ अभिनेत्याची नजर

अभिनेत्याने व्यक्त केली अजब इच्छा

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. तसेच शोमध्ये चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावणारे कलाकार शो आणखी रंजक करतात. नुकताच कपिल शर्मा शोमध्ये अभिनेते अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी एक अजब इच्छा व्यक्त केली आहे.

अनिल कपूर शोमध्ये कपिल शर्मासोबत गप्पा मारत असतात. तितक्यात ते अजब इच्छा व्यक्त करतात. मला अक्षय कुमारचे बँक खाते तर अमिताभ याच्या कपाटातील कपडे देखील चोरायचे आहेत असे अनिल कपूर म्हणातात. पुढे त्यांनी मलंग चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळी अभिनेत्री दिशा पटाणीचा डायट प्लॅन चोरला असल्याचे सांगितले आहे. अनिल कपूर यांचे बोलणे ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांचा AK Vs AK हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 6:35 pm

Web Title: anil kapoor reveals he wants to hack hijack akshay kumars bank balance avb 95
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये प्रिया मराठेची एण्ट्री
2 Video : नवीन वर्ष, नवा संकल्प! हृतिक शिकतोय ‘ही’ गोष्ट
3 Video : तीन पिढ्यांभोवती फिरणारा ‘त्रिभंग’; पाहा, चित्रपटाचा ट्रेलर
Just Now!
X