News Flash

नव्या वर्षात रणबीरची धमाकेदार एण्ट्री; केली आगामी चित्रपटाची घोषणा

रणबीरसोबत अनिल कपूर करणार स्क्रीन शेअर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होता. मात्र, आता लवकरच तो रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रणबीर त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

२०२१ या नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच रात्री बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी रणबीरने त्याच्या सोशल मीडियावर नव्या चित्रपटाचा टीझर शेअर केला. अ‍ॅनिमल असं रणबीरच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात रणबीर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor (@ranbir_kapoooor)


‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटाचा टीझर अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनीदेखील शेअर केला आहे. या टीझरमध्ये रणबीरचा व्हॉइस ओव्हर येत असून तो त्याच्या वडिलांशी संवाद साधताना दिसत आहे.

वाचा : दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी परत येणार; ‘अग्गबाई सासूबाई’मध्ये पुन्हा एकदा आजोबांचा दरारा

“बाबा, पुढच्या जन्मी तुम्ही माझा मुलगा म्हणून जन्म घ्या. मग पाहा, मी तुमच्यावर किती प्रेम करतो. मग त्याच्या पुढच्या जन्मात मी पुन्हा तुमचा मुलगा म्हणून जन्म घेईन. तुमच्या लक्षात येतंय ना मला काय सांगायचंय?,” असं रणबीर या टीझरमध्ये बोलताना दिसून येत आहे.

पाहा : चिमुकलीने केली वडिलांची बोलती बंद; पाहा, शिल्पा शेट्टीच्या मुलीचा क्युट व्हिडीओ

दरम्यान,अ‍ॅनिमल या आगामी चित्रपटात रणबीरसोबत अभिनेता अनिल कपूर, परिणीती चोप्रा आणि बॉबी देओलदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 6:06 pm

Web Title: anil kapoor shared animal teaser new year gift for fans ssj 93
Next Stories
1 चिमुकलीने केली वडिलांची बोलती बंद; पाहा, शिल्पा शेट्टीच्या मुलीचा क्युट व्हिडीओ
2 दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी परत येणार; ‘अग्गबाई सासूबाई’मध्ये पुन्हा एकदा आजोबांचा दरारा
3 रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ; बिग बींसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
Just Now!
X