News Flash

अनिल कपूर ‘त्याचा’ जीवच घेणार होते पण.. शेअर केला सिनेमाच्या सेटवरचा किस्सा

अनिल कपूर यांनी मागितली होती राहुल बोसची माफी

मालिका असो किंवा सिनेमा शूटिंग करत असताना अनेक कलाकार आपल्या भूमिकेत परिपूर्ण शिरण्याचा प्रयत्न करत असतात. भूमिकेला न्य़ाय देण्यासाठी ते त्या भूमिकेचा सखोल आभ्यास करतात. त्या भूमिकेशी जोडले जातात. अभिनय करत असताना अनेकदा बडे कलाकार त्या भूमिकेत इतकी बुडून जातात कि ते स्वत:लाही विसरतात.

अभिनेता अनिल कपूर गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. रोमॅण्टिक हिरो, व्हिलन, कॉमेडी तर कधी गंभीर अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. अनिल कपूर यांनी नुकताच त्यांच्या सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा शेअर केला आहे. 2015 सालात आलेल्या ‘दिल धडकने दो’ या सिनेमाच्या सेटवर घडलेली ही घटना थक्क करणारी आहे. या सिनेमातील एका सीनच्या शूटिंगवेळी अनिल कपूर यांनी अभिनेता राहुल बोस याचा जवळपास जीवच घेतला होता. कनिल कपूर यांनी स्वत: ट्विट करत यावेळी नेमक काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

‘दिल धडकने दो’ या सिनेमात अनिल कपूर यांनी कमल मेहरा यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने अनिल कपूर यांच्या मुलीची म्हणजेच आएशाची भूमिका साकारली होती.  तर राहुल बोस यांनी जावयाची. या सिनेमातील एका प्रसंगात राहुल आणि प्रियांका यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दाखवण्यात आलंय. यावेळी राहुल बोस सर्वांसमोर प्रियांकाला हाताला खेचून नेत असतो. मात्र याचवेळी अनिल कपूर चिडून सर्वांसमोर राहुल बोस याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतात असं दाखवण्यात आलंय.

मात्र प्रत्यक्षात हा सीन शूट करते वेळी अनिल कपूर भूमिकेत इतके शिरले होते कि सीनचा भाग नसतानाही त्यांनी एक वायर खेचली आणि राहुल बोसच्या गळ्याभोवती आवळली. हे पाहून सेटवरचे सगळेच थक्क झाले. सीनचा भाग नसतानाही अनिल कपूर यांनी केलेल्या या कृत्याने सगळेचं गोंधळले. अखेर त्यांना समजवण्यात आलं. यानंतर भानावर येते त्यांनी राहुलची माफी मागितली. मुलीच्या पाठी खंबीर उभं राहणाऱ्या पित्याची भूमिका साकारताना त्यांनी हे कृत्य केलं होत.

अनिल कपूर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत सिनेमातील या सीनची आठवण जागी केलीय. 2015 सालात आलेल्या ‘दिल धडकने दो’ या सिनेमात अनिल कपूर, प्रियांकासोबतच, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अशी स्टारकास्ट झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 9:26 am

Web Title: anil kapoor shares memoery from film dil dhadkne do sences where he almost killed rahul bose kpw 89
Next Stories
1 इसाबेल कैफच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत, सलमान म्हणाला…
2 “……आणि माझ्या चेहऱ्यावर पटकन हसू खुललं”, कंगना रणौतचं नवीन ट्विट
3 नव्या चित्रपटात दिसणार कधी न पाहिलेल्या रुपात; साऊथ सुपरस्टार प्रभासची घोषणा
Just Now!
X