News Flash

आर्थिक संकटामुळे करावे लागले होते ‘ते’ चित्रपट; अनिल कपूर यांचा खुलासा

"ही गोष्ट मान्य करण्यात मला काहीच वाईट वाटत नाही."

बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. ते अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील ओळखले जातात. करिअरमध्ये त्यांनी केवळ चांगल्या भूमिकांमुळे किंवा पटकथेमुळे चित्रपट स्वीकारले नाहीत तर आर्थिक अडचणींमुळे काही चित्रपट साइन करावे लागल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर म्हणाले, “मी हे केलं, खरं तर, मी त्या चित्रपटांची नावंसुद्धा सांगू शकतो. ‘अंदाज’, ‘हिर रांझा’,’रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटांनंतर माझं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं होतं. आम्ही सगळ्यांनी जे करायला पाहिजे होते ते केले, आणि हे मान्य करण्यात मला काही ही वाटत नाही. मी आणि माझं कुटूंब भाग्यवान आहोत की तो काळ आता गेला आणि त्यानंतर आमची परिस्थिती तेव्हासारखी राहिली नाही.”

आणखी वाचा : शाहिद कपूर सोशल मीडियावर मागतोय काम; पत्नी मीराला ठरवलं जबाबदार

ते पुढे म्हणाले, जर आमच्या नशिबाने यु टर्न घेतला आणि पुन्हा एकदा वाईट दिवसांचा आम्हाला सामना करावा लागला तर मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी दोनदा विचार करणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:06 pm

Web Title: anil kapoor sign films for money spoke about the financial crisis dcp 98
Next Stories
1 शाहिद कपूर सोशल मीडियावर मागतोय काम; पत्नी मीराला ठरवलं जबाबदार
2 बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत; केबीसीतील चर्चेनंतर झाला खुलासा
3 ‘तापसीच माझी खरी चाहती’; कंगनाचा टोला
Just Now!
X