News Flash

“तुमच्यासाठी लस १ मे नंतर आहे”, अनिल कपूर यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

अनिल कपूर यांनी घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

देशात सध्या लसीकरणाची मोहीम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी लस घेतली आहे. अभिनेते अनिल कपूरही त्या यादीत सामील आहेत. त्यांनी आजच करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यावरुन त्यांच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अनिल कपूर यांनी आज करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी याबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते म्हणतात, “दुसरा डोस घेतला. सर्वांनी घरी रहा, सुरक्षित राहा”. अनिल कपूर हे ६४ वर्षांचे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

त्यांच्या या फोटोत ते काळ्या टीशर्टमध्ये दिसत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स करत लक्ष वेधून घेतलं आहे.
एक युजर म्हणतो, “सर खरंतर तुम्ही १मेपासून लस घेण्यासाठी कायदेशीरपणे पात्र आहात”. तर दुसरा युजर म्हणतो, “अरे सर १८ वर्षांपासून वरच्यांना तर १ मे पासून लस देण्यात येणार आहे. तुम्हाला आधी कशी मिळाली?”

करोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरु होणार आहे. या टप्प्यात १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे.

अनिल कपूर हे त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. वयाच्या ६४व्या वर्षीही त्यांचा फिटनेस एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. त्यांच्या लूक्स आणि फिटनेसवरुन त्यांचे चाहते कायमच त्यांचं कौतुक करत असतात. अनिल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. ते आपले वर्कआऊटचे व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 5:06 pm

Web Title: anil kapoor took second dose of corona vaccine vsk 98
Next Stories
1 कंगना रणौत पुन्हा भडकली; “बॉलिवूडमधील माफिया गँग अफवा पसरवतात”
2 अजय देवगणचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’मधील लूक प्रदर्शित
3 खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो; ‘या’ अभिनेत्याचा संघर्ष ऐकून म्हणाल..
Just Now!
X