X
X

‘नायकचा सीक्वल यावा’, अनिलने व्यक्त केली इच्छा

'नायक : द रियल हीरो' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता.

देशाच्या राजकीय उदासीनतेवर भाष्य करणारा अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता. त्यामुळे या चित्रपटाचा सीक्वेल यावा अशी अनिलची इच्छा असल्याचं त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नायक : द रियल हीरो’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामध्ये राजकारण, समाजातील उदासीनता आणि भ्रष्टाचार यावर भाष्य करण्यात आलं होतं.

“जर १९ वर्षानंतर नायकचा सीक्वेल येणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. या सीक्वेलमधून पुन्हा नवे विषय आणि नव्या कल्पना मांडता येतील”, असं अनिलने सांगितलं.

दरम्यान, नायकच्या सीक्वेलविषयी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नसून यात कोणती स्टारकास्ट झळकणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही. नायक हा चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर यांच्या ‘मुधलवन’चा रिमेक होता. या चित्रपटामध्ये अनिल कपूरने पत्रकाराची भूमिका साकारली होती, ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. यामध्ये अनिल कपूरसोबत राणी मुखर्जी, दिवंगत अभिनेता आमरिश पुरी यासारखी कलाकार मंडळी झळकली होती.

 

23
First Published on: February 19, 2019 11:44 am
Just Now!
X