06 March 2021

News Flash

अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनीता हसनंदानी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती लवकरच एक गोड बातमी देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करताना दिसत आहे. आता अनीताने बेबी बंपसह चक्क शकिरा गाण्यावर डान्स केला आहे.

नुकताच अनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी बंपसह शकिरा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘एकदा जो कोणी शकिराचा फॅन होतो तो कायम शकीराचा फॅन राहतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

सध्या अनीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये तिने आणि तिच्या पतीने सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 6:57 pm

Web Title: anita hassanandani dance with baby bump on shakira song avb 95
Next Stories
1 ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ मध्ये होणार अंकुश चौधरीची एण्ट्री
2 ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचा शुभारंभ!
3 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये होणार एव्हरग्रीन सिनिअरची एण्ट्री 
Just Now!
X