अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी ९ फेब्रुवारी रोजी चिमुकल्याचे आगमन झाले. अनिताने एका मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली होती. आता अनिताने मुलाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो हॉस्पिटीलमधील आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘आता आपण तिघे आहोत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच सोबत हॅशटॅग वापरत ‘NewMommyDaddy’ असे म्हटले आहे. अनिताचा हा फोटो सध्या चर्चेत आहे.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनितासोबतचा फोटो शेअर केला करत मुलगा झाल्याचे म्हटले होते. या फोटोवर ९ फेब्रुवारी २०२१ ही तारीख टाकण्यात आली होती. तसेच मुलगा झाला असे देखील लिहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

अनिताने सप्टेंबरमध्ये सोशल मीडियापोस्टद्वारे आई होणार असल्याची माहिती दिली होती. अनिताने फोटो शेअर करत ‘मी २०२१ची वाट पाहात आहे आणि त्यासाठी खूप उत्सुक आहे’ असे कॅप्शनमध्ये म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनंतर अनिता आणि रोहितने फोटोशूट केले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.