‘अन्हे घोरे दा दान’ या पंजाबी चित्रपटास यंदाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात मानाचा सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे दिग्दर्शक गुरविंदर सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. अंजली पाटील यांना ‘विथ यू, विथाउट यू’ या सिंहली-तामिळ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशनची निर्मिती असलेला हा चित्रपट गुरदियाल सिंग यांच्या कादंबरीवर आधारित आहे. सुवर्णमयूर व २० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाला अगोदरच तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहेत.
विशेष शताब्दी पुरस्कार मीरा नायर यांच्या द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट या चित्रपटास मिळाला आहे. त्याचा आशियातील प्रीमियर आज झाला. अमेरिकी दिग्दर्शक ल्युसी मुलाय यांना खास ज्युरी पुरस्कार त्यांच्य उना नोचे या स्पॅनिश चित्रपटासाठी मिळाला. त्यांना रजत मयूर पुरस्कार मिळाला आहे.  क्यू हॉन जिऑन यांना द वेट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
पोलिश-रशियन-जर्मन भाषेतील ‘रोझ’मधील भूमिकेसाठी मार्सिन दॉर्सिनस्की यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट एका जर्मन सैनिकाच्या विधवेवर आधारित आहे. गोव्याचे राज्यपाल बी.व्ही. वांचू, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित होते.