बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे यांनी यंदा वर्षाअखेरीस लग्नबंधनात अडकण्याचे ठरवले आहे. हे दोघे टेलिव्हिजन दिवसांपासून एकमेकांना ओळखत असून त्यांनी आपल्या लग्नाची माहिती मीडियाला दिली. यावेळी सुशांत म्हणाला की होय आम्ही या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहोत.”
फिल्मफेअर पुरस्कार पार्टीत सुशांत आणि अंकिता एकत्र आले होते. तेव्हा अंकिताने देखील त्यांच्या लग्नाच्या बातमीचा दुजोरा दिला. सुशांत सध्या नीरज पांडे दिग्दर्शित महेंद्रसिंग धोनी या चरित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या माझे चित्रपटामध्ये काम करण्याचे कोणतेही प्लॅन्स नसल्याचेही अंकिताने स्पष्ट केले.