27 September 2020

News Flash

Video : भावूक झालेल्या अंकिता लोखंडेने घेतली होती एकता कपूरची भेट

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांना दु:ख झाले आहे. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. १४ जून रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अंकिताने एकता कपूरची भेट घेतली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता सुशांतचा मित्र निर्माता संदीप सिंहसोबत दिसत आहे. ते दोघे ही एकता कपूरच्या घरातून बाहेर येताना दिसत आहेत. अंकिता अतिशय दु:खी असल्याचे दिसत आहे.

अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ वूंपलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यापूर्वी अंकिता सुशांतच्या घरातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सुशांतच्या निधनानंतर अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे माहितच नव्हते. तिने ‘काय?’ एवढा एकच शब्द बोलून फोन कट केला होता. अचानक सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून अंकितालाही धक्काला बसला होता.

सुशांत आणि अंकिताने छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पाच वर्षे त्यांनी एकमेकाला डेट केले होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:30 pm

Web Title: ankita lokhande and producer sandeep singh spotted leaving ekta kapoor house avb 95
Next Stories
1 भूमिका निवडताना जितेंद्र करतो ‘या’ गोष्टींचा विचार!
2 ‘घराणेशाही नसेल तर समाजव्यवस्था ढासळेल’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा
3 सुरजला वाचवण्यासाठी सलमानने केले होते प्रयत्न; जिया खानच्या आईचा गंभीर आरोप
Just Now!
X