News Flash

फ्लॅटच्या EMI बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर अंकिता प्रियकर विकीबद्दल म्हणाली, ‘तूच माझा…’

फ्लॅटचे हप्ते सुशांत भरत होता असा आरोप झाल्यानंतर अंकिताने...

एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत सिंह राजपूत भरत होता, असा आरोप झाल्यानंतर अंकिताने समोर येऊन सर्व आरोपांचे खंडन केले. अंकिता लोखंडेनं सोशल मीडयावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट करुन हे सर्व आरोप खोडून काढले. दरम्यान या संपूर्ण वादामध्ये अंकिताचा प्रियकर विकी जैन तिच्यामागे ठामपणे उभा राहिला.

गृहकर्जाचे हप्ते मीच फेडत होते, हे सिद्ध करणारे सर्व पुरावे अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. तिच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टवर विकी जैनने ‘हॅटस ऑफ मिस लोखंडे’ असे म्हणत हार्टचा इमोजी टाकलाय. त्यावर अंकिताने विकीचे आभार मानताना ‘तूच माझी शक्ती आहेस’ असे म्हटले असून सोबत हार्टचा इमोजी टाकला आहे. व्यावसायिक विकी जैनला अंकिता डेट करत असून हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

विकी जैनच्या आधी सुशांत सिंह राजपूत अंकिताच्या आयुष्यात होते. दोघांमध्ये अनेकवर्ष अफेअर सुरु होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने माध्यमांसमोर येऊन तिचे सुशांतसोबतचे नाते उलगडले. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी तिची मागणी आहे.

आणखी वाचा- सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक; शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

दरम्यान अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी केला होता. या बातमीचं खंडन करुन आरोप करणाऱ्यांना अंकिता लोखंडेनं आरसा दाखवला आहे. अंकिता लोखंडेनं सोशल मीडयावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा हप्ता अंकिता स्वत: भरत असल्याचं दिसत आहे. तसेच घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिता लोखंडेची खात्याची माहिती आहे. अंकिताने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:27 pm

Web Title: ankita lokhande calls boyfriend vicky jain her strength dmp 82
Next Stories
1 निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर; रुग्णालयाची माहिती
2 सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक; शेअर केली ‘ही’ खास पोस्ट
3 ‘देवा श्री गणेशा’ मालिकेत अभिनेता पंकज विष्णू साकारणार शिवशंकर
Just Now!
X