28 February 2021

News Flash

अंकिताने शेअर केला ‘फर्स्ट किस’ गाण्याचा व्हिडीओ, झाली सोशल मीडियावर ट्रोल

पाहा व्हिडीओ..

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. अंकिता बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. पण नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनी सिंगच्या ‘फर्स्ट किस’ या गाण्यावर लिपसिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी तर तिला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

एका यूजरने तर ‘ती सुशांतला विसरली?’ असे म्हटले आहे.

दरम्यान, सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता सुमारे ४० दिवस सोशल मीडियापासून दूर राहिली होती. त्यानंतर तिने सुशांतसाठी केलेली पहिली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला होता. ते दोघे जवळपास ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. आता अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच दोघेही लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:35 am

Web Title: ankita lokhande dance on honey singhs first kiss song video viral dcp 98 avb 95
Next Stories
1 देवाच्या प्रेमासाठी डॉलीबाईंनी स्वीकारलं नवं आव्हान
2 Video : माय-लेकाची सुपर जोडी! सलमानने आईसोबत धरला ‘या’ गाण्यावर ताल
3 ‘माझा होशील ना’मध्ये सई-आदित्यची रोमॅण्टिक केमिस्ट्री
Just Now!
X