News Flash

अंकिता लोखंडेचे वडील रुग्णालयात दाखल

अंकिताने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो केला पोस्ट

अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंकिताने इन्स्टा स्टोरीमध्ये वडिलांचा रुग्णालातील फोटो पोस्ट केला आहे. ‘लवकर बरे व्हा’, असं तिने या फोटोसोबत लिहिलंय. शशिकांत यांना कशासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

अंकिता गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर तिने माध्यमांसमोर येऊन मतं मांडली. सुशांतच्या कुटुंबीयांना कायम पाठिंबा देणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड व रिया चक्रवर्तीची जिवलग मैत्रीण शिबानी दांडेकर हिने अंकितावर हल्लाबोल केला होता. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी अंकिता रियाविरोधात वक्तव्य करत असल्याचं शिबानीने म्हटलं होतं. त्यावरही अंकिताने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. ड्रग्स प्रकरणावरूनही अंकिताने रियावर प्रश्न उपस्थित केले होते. “प्रियकराची मानसिक स्थिती माहित असतानाही तुम्ही त्याला ड्रग्सचं सेवन करू देणार का”, असा सवाल तिने विचारला.

सोशल मीडियावरुनही अंकिताला पाठिंबा मिळत आहे. कंगना रणौत असो, सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती असो किंवा मग छोट्या पडद्यावरील कलाकार, अनेकजण अंकिताच्या बाजूने उभे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 8:58 am

Web Title: ankita lokhande father hospitalised she wishes him a speedy recovery ssv 92
Next Stories
1 फॅसिझम थांबवा, आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये; कंगनाचं ट्विट
2 आठ भारतीय चित्रपट बुसान महोत्सवात 
3 बॉलिवूड विरोधातील वादात कंगनाने केला ‘सनी लिओनी’चा उल्लेख; म्हणाली…
Just Now!
X