अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. दरम्यान NCBने केलेल्या या कारवाईवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने प्रतिक्रिया दिली आहे. “हर हर महादेव, सत्यमेव जयते, सुशांतला न्याय मिळणारच” अशा आशयाचं ट्विट करुन तिने समाधान व्यक्त केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक; समोर आली आणखी १५ नावं

शोविक आणि मिरांडा यांनी सुशांतला नशेची सवय लावून अंमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

अवश्य पाहा – “किसिंग करण्यास नकार दिल्यामुळे चित्रपटातून काढलं”; अभिनेत्रीने सांगितला चकित करणारा अनुभव

एनसीबीने अंमली पदार्थ विकणाऱ्या करण अरोरा, अब्बास खेतान, झैद विलात्रा आणि अब्देल बसीत परिहार या चार तरुणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून शोविक, मिरांडा यांचा सहभाग स्पष्ट झाला. यापैकी परिहार याला शुक्रवारी एनसीबीने दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. परिहारच्या पोलीस कोठडीची मागणी करताना एनसीबीने शोविक, मिरांडा अंमली पदार्थासाठी परिहारच्या संपर्कात होते, अशी माहिती देत या प्रकरणी सखोल तपास करणे आवश्यक आहे. तसेच परिहारने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार तो शोविकच्या सूचनेवरून विलात्रा आणि कैझान इब्राहिम या दोघांकडून अंमलीपदार्थ विकत घेत होता, असे न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने परिहार याला ९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली. विलात्राप्रमाणे परिहार यानेही अंमलीपदार्थ पोच केलेल्या अनेकांची नावे उघड केली आहेत. त्याबाबत खातरजमा केली जाईल, असेही एनसीबीने न्यायालयाला सांगितले.