28 October 2020

News Flash

नऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट

अंकिता लोखंडेचा अस्सल मराठमोळा साज!

नवरात्र सुरु झालं आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं व उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. यंदा करोनाचं सावट असल्यामुळे प्रत्येकालाच हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. मात्र, प्रत्येक भक्तामध्ये देवीची आराधना, तिची सेवा करण्याचा उत्साह कायम आहे. यामध्ये सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही घट बसले आहेत, देवीची स्थापना झाली आहे. यामध्येच अनेक अभिनेत्रींनी या दिवसांमध्ये खास फोटोशूट केलं आहे. यात अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील मागे राहिलेली नाही.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिताचा मराठमोळा लूक दिसून येत आहे. तिने फोटोसोबत काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. या फोटो, व्हिडीओमध्ये अंकिताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर अस्सल मराठमोळ्या दागिण्यांचा साज केला आहे.


“मराठमोळ्या दागिण्यांवरचं प्रेम, पारंपरिक मराठी पदार्थ आणि मराठमोळी नववधू”, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान,सध्या सगळीकडे नवरात्रीचे वारे वाहत असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जातात. त्यामुळे अनेक महिला,तरुणी आणि काही वेळा पुरुषदेखील देवीच्या साड्यांचा रंग फॉलो करताना दिसतात. यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 9:14 am

Web Title: ankita lokhande photoshoot video viral on internet in marathi traditional outfit ssj 93
टॅग Navratra
Next Stories
1 स्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का?
2 पुन्हा एकदा पॉपकॉर्न संगे..
3 चित्रपटसृष्टीवरचे आरोप हे टाळेबंदीतील नैराश्याचे प्रतीक
Just Now!
X