24 September 2020

News Flash

प्रियकर विकी जैनविषयी अंकिता म्हणते…

अंकिताने इन्स्टाग्रामवर विकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. एकेकाळी अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेली अंकिता व्यावसायिक विकी जैन याला डेट करत आहे. या दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे. अंकिता अनेक वेळा सोशल मीडियावर विकीसोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर विकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये विकी अंकिताला प्रपोज करताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती एकटीच असून विकीसमोर आल्यानंतर तिची कशी द्विधा अवस्था होते हे सांगितलं आहे.

‘विकीबद्दल मी दिवस-रात्र न थांबता सतत बोलू शकते. मात्र, ज्यावेळी तो समोर असतो त्यावेळी मी शब्दहीन असते. काय बोलावं ते मला सुचत नाही’, असं कॅप्शन अंकिताने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

She can talk about him all day but when he is actually around she is speechless…….

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

तर दुसऱ्या एका फोटोमध्ये विकी अंकिताला प्रपोज करताना दिसत आहे, या फोटोला कॅप्शन देत ‘विचार करावा लागेल’,असं म्हटलं आहे. तिच्या या कॅप्शनवरुन विकी तिला लग्नासाठी मागणी घालतोय, असं अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न अंकिताने केल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

I will think about it @jainvick

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

दरम्यान, अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेच्या सेटवरच अंकिता आणि सुशांत यांचं सूत जुळलं. मात्र सहा वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अंकिता विकीला डेट करत आहे. विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 9:22 am

Web Title: ankita lokhande romantic post for boyfriend vicky jain ssj 93
Next Stories
1 विवेक ओबेरॉयला भारताच्या पराभवानंतर मीम शेअर करणं पडलं महागात
2 टीम इंडियाच्या पराभवाबाबत विवेक ओबेरॉयने शेअर केलं GIF, चाहत्यांनी झापले
3 चित्र रंजन : वास्तवाची नाटय़मय मांडणी
Just Now!
X