अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. बहुचर्चित ठरत असलेल्या या चित्रपटामध्ये कंगना झांशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अंकिता लोखंडे रणरागिणी झलकारीबाईंची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी अंकिताने विशेष मेहनत घेतली असून तिने इन्स्टाग्रामवर तलवारबाजीच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या चित्रपटासाठी कंगना आणि अंकिताने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे चित्रपटामधील या दोघींची तलवारबाजी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही कालावधी बाकी असल्यामुळे अंकिताने चाहत्यासाठी तलवारबाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

And the war begins!!#5daystogo #jhalkaribai #manikarnikaon25thjan2019 @manikarnikafilm #swordfightingskills

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

‘आणि आता युद्धाला सुरूवात झाली आहे’, असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता चित्रपटाच्या सेटवर असून सराईतपणे तलवारबाजी करत आहे.

येत्या २५ जानेवारीला ‘मणिकर्णिका..’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून झांसीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. हा जीवनप्रवास उलगडत असताना झलकारीबाई यांची महत्वपूर्ण भूमिका होती. झलकारीबाई या लक्ष्मीबाईच्या सैन्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्या नेहमी उभ्या असायच्या. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची संहिता ‘बाहुबली’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.