News Flash

Video: अंकिता लोखंडने शेअर केला डान्स व्हिडीओ

सध्या तिचा व्हिडीओ चर्चेत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अंकिता चर्चेत होती. आता पुन्हा अंकिता सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे, टोनी कक्करच्या ‘नाच मेरी लैला’ या गाण्यावर डान्स करत आहे. दरम्यान अंकिताने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत नाच मेरी जान असे कॅप्शन अंकिताने दिल आहे. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओला ९५ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताला झी रिश्ते पुरस्कार सोहळ्यात उत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याचा फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने सुशांत सिंह राजपूतसोबत पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या वेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 5:06 pm

Web Title: ankita lokhande shared dance video on tony kakkars nach meri laila song dcp 98 avb 95
Next Stories
1 कंगना रणौतचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल
2 नेहमी मला ट्रोल केले जाते; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
3 नजर वेधून घेणारी नोज रिंग, कपाळी कुंकू… मिलिंद सोमणचा हटके लूक
Just Now!
X