News Flash

‘सुशांतची हत्या झाली, असं कधीच म्हणाले नाही’; अंकिता लोखंडेचा खुलासा

'जर तुझं प्रेम होतं तर..'; अंकिताचा रियाला प्रश्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असं अंकिताने म्हटलं आहे. याविषयी तिने एक मोठी पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीविषयीदेखील भाष्य केलं आहे.

“मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते. मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि कोणाला दोषीदेखील म्हटलेलं नाही. मी कायम माझ्या मित्रासाठी, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांची साथ देत आहे. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, “अनेकांनी मला जाहीरपणे विधवा किंवा सवत असे म्हटलं, मात्र मी त्याचीही कधी उत्तरं दिली नाहीत. मी फक्त २०१६ पर्यंत त्याच्यासोबत काय काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला”.

दरम्यान, अंकिताने या पोस्टमध्ये रिया चक्रवर्तीलादेखील काही प्रश्न विचारले आहेत. जर तुझं इतकं प्रेम होतं तर त्याला ड्रग्स घेताना अडवलं का नाही?,असं अंकिताने विचारलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अंकिता लोखंडे सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त आहे. तसंच रियाला एनसीबीने अटक केल्यानंतरही तिने आनंद व्यक्त केला होता. मात्र आता तिने केलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 9:18 am

Web Title: ankita lokhande sushant murder or suicide rhea chakraborty drugs depression ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 “बॉलिवूडमध्ये घराणेशाही नाही पण…”; पियुष मिश्रा म्हणतात…
2 दिवसभर फक्त कंग‘नाच’
3 काश्मिरी पंडितांच्या मुद्यावरून शिकाराच्या लेखकानं कंगनाला सुनावलं, म्हणाले…
Just Now!
X