24 February 2021

News Flash

सुशांतच्या मृत्यूमुळे अंकिताला बसला जबरदस्त धक्का; ट्विट करुन म्हणाली…

सुशांतच्या मृत्यूवर अंकिता लोखंडेने दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला जबरदस्त धक्का बसला आहे. तिने एक महिन्यानंतर त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

अंकिताने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये देवाऱ्यात दिवा लावलेला दिसत आहे. या फोटोवर तिने “तू जिथेही असशील तिथे आनंदी राहा” अशा आशयाचं ट्विट करुन आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताच्या या ट्विटवर भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. दोघे लग्न करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. अंकितासोबत ब्रेकअप केल्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:43 pm

Web Title: ankita lokhande tweet on sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 कंगनाला पोलिसांनी खरंच समन्स बजावले का? रंगोलीने सांगितलं सत्य
2 #CandleForSSR म्हणत कंगनाने वाहिली सुशांतला श्रद्धांजली
3 प्रभाससोबत काम करण्यासाठी दीपिका घेणार आजवरचे सर्वाधिक मानधन?
Just Now!
X