News Flash

Video : सुशांतच्या आत्महत्येमुळे भावूक झालेल्या अंकिताने घेतली कुटुंबीयांची भेट

सुशांतने आत्महत्या केल्याचं समजताच अंकिता सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ऐन उमेदीच्या काळात सुशांतने आत्महत्या करुन त्यांचं जीवन संपवलं. त्यामुळे कलाविश्वासह सामान्य जनताही हळहळ व्यक्त करत आहे. सुशांतच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. यातलीच एक व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. सुशांतने आत्महत्या केल्याचं समजताच अंकिता काही काळासाठी सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता सुशांतवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अंकिताने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्यावर अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘इंडिया टुडे’ने तिच्याशी संपर्क साधला होता. मात्र सुशांतने आत्महत्या केली हेच तिला ठाऊक नव्हतं. त्यामुळे फोनवरील प्रश्न ऐकून अंकिता गडबडून गेली आणि तिने केवळ ‘काय?’ असा प्रश्न विचारुन फोन कट केला. तिच्या या प्रतिक्रियेवरुन तिला धक्क बसल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. त्यानंतर मंगळवारी (१६ जून) अंकिताने सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

#ankitalokhande today at #SushantSinghRajput home to meet his family #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून तिच्या डोळ्यात अश्रु तरळताना दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर सोमवारी(१५ जून) विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अंकिताने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

दरम्यान, यावेळी अंकितासोबत तिचा मित्र संदीप सिंहदेखील होता. अंकिता आणि सुशांत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर हे दोघं एकमेकांना डेटही करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्या दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 3:31 pm

Web Title: ankita lokhande visited sushant singh rajput home at bandra video viral on internet ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीबाबत रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा
2 “ड्रिप्रेशनलाच पाठवा ड्रिप्रेशनमध्ये”; धर्मेंद्र यांचा मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल
3 ‘मला त्या लोकांची गोष्ट माहित आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं’, दिग्दर्शकाचं सुशांतसाठी ट्विट
Just Now!
X