सोशल मीडियावर ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झालीय. सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी तिने सुशांतच्या आठवणीत बरेच व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर आज तिने तिचा बॉयफ्रेंड विक्की जैन याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. यात तिने बॉयफ्रेंड विक्की जैनला जगातला सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड म्हटलंय.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही इमोशनल पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “डिअर विक्की, तु माझ्यासोबत तेव्हा होतास जेव्हा मी संकटात होती… त्यावेळी ‘तु कशी आहेस ?, तुला कोणत्या मदतीची गरज आहे का?, तुला कुठे बाहेर जायचंय का? म्हणजे तुला जरा मोकळं वाटेल…’ असं मला विचारणारा तु पहिलाच व्यक्ती आहेस…तु प्रत्येक वेळी माझी चिंता करत होतास आणि मी प्रत्येक वेळी म्हणत आले की ‘मी ठीक आहे’…कारण मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहेस…मला तुझे आभार मानायचे आहेत…कारण तु जगातला सर्वात बेस्ट बॉयफ्रेंड आहेस…मला काय हवंय हे तुला सांगायची कधी गरज पडत नाही…तुला नेहमीच न बोलता कळतं ते…तुझे खरंच खूप आभार….मला प्रत्येक वेळी एका राणीप्रमाणे ठेवलंस यासाठी….कितीही महत्त्वाचं काम असलं तरी माझ्यासाठी वेळ काढतोस…माझ्या कुटुंबीयांसोबत नातं तयार केलंस यासाठी…आणि माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत हॅंगआऊट केलंस यासाठी सुद्धा…”

यापुढे पोस्टमध्ये लिहिताना अंकिता लोखंडे म्हणाली, “माझ्यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण दोघांनीही आयुष्यात भरपूर चढ-उतार पाहिलेत… तु मला विश्वास दिला होतास की एक दिवस सगळं काही सुरळीत होईल…तु नेहमीच दिलेला शब्द पूर्ण केलास आणि आज माझ्यासोबत आहेस…या सगळ्या कारणांसाठी मी तुझी कायम आभारी असणार आहे. मी पहिल्यापेक्षा आणखी जास्त तुझ्या प्रेमात पडलेय.”

या पोस्टच्या शेवटी अंकिता लोखंडेने लिहिलंय, “मला कधीच प्रेम आणि आनंद मिळणार नाही हा विचार करून माझं मन तुटत होतं. गेल्या काही वर्षात मी बऱ्याच अडचणीतून गेलेय….आणि मग एक दिवस मी तुला भेटले… तु मला विश्वास देत आलास…आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग पहिल्यासारखं कधीच राहीलो नाही…तुझे खूप खूप आभार माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला जगातली सर्वात नशीबवान मुलगी ठरवल्याबद्दल…त्या प्रेमाचे खूप आभार, ज्यामुळे मी एक उत्तम व्यक्ती बनण्यासाठी मदत केली…विक्की, तुला माझा सलाम…मला कायम सपोर्ट केलंस त्यासाठी…मी तुला वचन देते की जगातलं सगळं सुख तुला देत राहील…आणि ते तुला मिळालंच पाहीजे…ज्या पद्धतीने तु परिस्थितीशी सामना केलास, तो प्रत्येक जण करू शकत नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप आभार…विक्की जैन, आदर आणि प्रेम कायम तुझ्यासाठी राहील…”