News Flash

तब्बल १५ वर्षांनंतर अंकुश चौधरीची छोट्या पडद्यावर एण्ट्री; ‘या’ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी कला विश्वातही अनेक कलाकार पुन्हा छोट्या पडद्यावर पुररागमन करत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

ankush-chaudhari

देशात उद्भवलेल्या करोनाच्या संकटाचा फटका मराठी सिनेसृष्टीला देखील मोठ्या प्रमाणात बसला. अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग ठप्प पडलं. त्यानंतर चित्रीकरण पुन्हा सुरळीत सुरु झाल्यानंतर मराठी कला विश्वातही अनेक कलाकार पुन्हा छोट्या पडद्यावर पुररागमन करत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे.

हे देखील वाचा: श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. मी जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन.” असं अकुश म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

 

अंकुश चौधरीने त्याच्या या शोचा प्रोमा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताच अनेक मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, सोनाली खरे अशा अनेकांनी अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकुशसोबतच अभिनेत्रा श्रेयस तळपदेने देखील छोटया पडद्यावर कमबॅक केलंय. झी मराठीवर श्रेयस तळपदेची नवी मालिका सुरु होतेय. यासाठी अंकुशने श्रेयसला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2021 11:40 am

Web Title: ankush chaudhari comeback on television will judge me honar superstar dance show kpw 89
Next Stories
1 श्रद्धा कपूरचं पर्सनल चॅट व्हायरल; खास व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणाली…
2 Raataan Lambiyan Video Out: ‘शेरशाह’चं पहिलं गाणं ‘रातां लम्बियां’ झालं रिलीज
3 ‘पटियाला बेब्स’ फेम अशनूर कौर बारावी पास; मिळवले इतके टक्के