News Flash

“….मग करू दुनियादारी!”; अंकुश चौधरीचं अनोख्या अंदाजात चाहत्यांना आवाहन

हटके पोस्टर शेअर करत केलं मास्क घालण्याचं आवाहन

देशात करोना महामारीमुळे निर्माण झालेला हाहाकार कमी होण्याचं नाव घेताना दिसून येत नाही. या कठीण काळात लोकांना रूग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स देखील मिळत नाहीत. या सर्व परिस्थितीला पाहून सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी याने पुढे येऊन आपल्या हटके स्टाईलने मास्क घालण्याचं आवाहन चाहत्यांना केलंय.

नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांच्या ‘दुनियादारी’ चित्रपटात साकारलेले ‘दिग्या’ आणि ‘श्रेयस’ दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरमधल्या दिग्या आणि श्रेयसने तोंडावर मास्क घातलेले दाखवले आहेत. अभिनेता अंकुश चौधरीचा गाजलेला ‘दुनियादारी’ चित्रपटातला डायलॉग ही यात लिहिलाय. ‘तेरी मेरी यारी…अगोदर मास्क घालू मग दुनियादारी !….असं या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

अभिनेता अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टरवर अभिनेता स्वप्निल जोशीने ही कमेंट केलीय. ‘दिग्या बोलला म्हणजे बोलला…’ असं त्याने या कमेंटमध्ये लिहिलंय. अभिनेता अंकुश चौधरीने शेअर केलेलं हे पोस्टर चाहत्यांना आवडलं असून त्यांनी मोठ्या प्रमाणात व्हायरल ही केलंय.

अभिनेता अंकुश चौधरी त्याच्या आगामी ‘लॉकडाउन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची देखील भूमिका पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगदेखील पुर्ण झालं असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 11:28 am

Web Title: ankush chaudhary has appealed people wear masks prp 93
Next Stories
1 मलायकासाठी जेवणात काय बनवशील?, अर्जुनने केला खुलासा
2 “आपलं सिस्टम फेल झालंय का?”, आईसाठी बेड शोधताना जॅस्मिनला करावा लागला संघर्ष
3 करोनाला हरवल्यानंतर अभिनेते मिलिंद सोमण करणार ‘हे’ काम
Just Now!
X