मोठ्या पडद्यावरील आपला वावर आणि शैलीने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पडणारा महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीत बेंचमार्क सेट केला आहे. उत्कृष्ट फॅशन सेन्स असलेला आणि तीन वेळा महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉनचा पुरस्कार पटकावून हॅट्रिक करणाऱ्या अंकुशच्या जबरदस्त स्टाईलला तरुणांनी नेहमीच उचलून धरले आहे. अंकुशची ‘हॅशटॅग’ नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड केली आहे. ‘द हाउस ऑफ कॉरनिया’चे सब-ब्रँड असलेला ‘हॅशटॅग’ ब्रँडमध्ये तरुणांसाठी फॉरमल, कॅज्युअल, पार्टी आणि एथनिक वेअरमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. अंकुशची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता, तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ आणि ब्रँडला मॅच होणारे व्यक्तिमत्व यामुळे फॅशन ब्रँडला प्रमोट करण्यासाठी अंकुशची निवड करण्यात आली. नुकतेच पुण्यामध्ये अंकुशच्या उपस्थितीत ‘हॅशटॅग’ स्टोर लाँचचा सोहळा पार पडला.