News Flash

आशुतोष यांनी पहिल्याच भेटीत केला कौतुकाचा वर्षाव; रेणुका शहाणेंची खास लव्हस्टोरी

एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे त्यांची लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका नेहमी स्पष्टपणे आपलं मत आणि विचार मांडताना दिसतात. ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटाच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळालेल्या रेणुका यांनी अभिनेता आशुतोष राणाशी लग्न केले आहे. आज २५ मे रोजी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी…

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची लव्हस्टोरी चित्रपटातील एका कथेपेक्षा वेगळी नाही. रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती असे म्हटले जाते. गायिका राजेश्वरी सचदेव यांनी या दोघांची ओळख करुन दिली. त्यावेळी आशुतोष यांच्याबद्दल रेणुका यांना अजिबात माहिती नव्हती. उलटपक्षी आशुतोष यांना रेणुकाविषयी बऱ्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी मी तुझा मोठा चाहता आहे असे रेणुका यांना सांगितले होते. या पहिल्या भेटीनंतर जवळपास ३ महिने ते एकमेकांना भेटले नाही. मात्र, त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडू लागले.

आणखी वाचा : १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी प्रकाश राज यांनी केले लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी

एकीकडे रेणुका आणि आशुतोष यांची लव्हस्टोरी सुरु होती. ते एकमेकांशी लग्न करण्याच्या विचारात होते. तर दुसरीकडे रेणुका यांच्या आई संभ्रमात होत्या. कारण, आशुतोष हे मध्य प्रदेशमधील एका लहानशा गावातून आले होते. त्यातच त्याचे कुटुंब प्रचंड मोठे होते. त्यामुळे रेणुका हे सगळं कसे मॅनेज करतील हा प्रश्न त्यांच्या आईला होता. परंतु, त्यानंतर रेणुका-आशुतोष यांनी आईची समजूत काढली आणि अडीच वर्षांनी त्यांनी लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा : झोपेतून उठताच उर्मिलाला समोर पाहिले अन्…; आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी

दरम्यान, रेणुका शहाणे यांच्या लग्नाला आता जवळपास १९-२० वर्ष झाली आहेत. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलंदेखील आहेत. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे दोघंही कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 1:12 pm

Web Title: anniversary special ashutosh rana and renuka shahane love story avb 95
Next Stories
1 प्रियांका चोप्राने सांगितले सुखी संसाराचे रहस्य ; म्हणाली, “फक्त दोनच वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून….”
2 जातिवाचक शब्दांचा उल्लेख करणं अभिनेत्री युविका चौधरीला महागात; नेटकऱ्यांकडून अटकेची मागणी
3 लेकाची बाजू घेत उदित नारायण यांनी साधला अमित कुमार यांच्यावर निशाणा
Just Now!
X