25 September 2020

News Flash

आणखी एक बॉलीवूड जोडी होणार विभक्त

आम्हाला आमचे वैयक्तिक आयुष्य जगू दयावे.

बिपाशा बसूच्या लग्नाच्या बातमीनंतर बॉलीवूडमधील ब्रेकअप आणि घटस्फोटाचे वारे आता थांबतील असे वाटत होते. मात्र, आता आणखी एक बॉलीवूड जोडी विभक्त होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर आणि मॉडेल जेसी रंधावा हे आता विभक्त होणार आहेत. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर आपण विभक्त होणार असल्याचे या दोघांनी अधिकृतरित्या जाहीर केलेय. त्यांनी म्हटलेय की, जेसी रंधावा आणि संदीप सोपारकर आम्ही दोघांनी एकमेकांपासून काही वेळ विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून, भविष्यात कोणता मार्ग निवडावा यावर आम्ही विचार करू शकू. आमच्या ११ वर्षांच्या नात्यात आम्ही खूप छान आणि अविस्मरणीय क्षण जगलो. ज्यातील ५ वर्षे आम्ही एकमेकांना डेट केले आणि उर्वरित वर्षे आम्ही विवाहीत दाम्पत्य म्हणून एकत्र घालविली. पण आता आम्ही दोघांनीही  केवळ नृत्य क्षेत्रात एकत्र काम करायचे ठरविले आहे. यापुढे आम्ही दोघेही आमच्या आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. त्यामुळे आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो की  आमच्या खासगी आयुष्यातील गोष्टींचा आदर करावा आणि आम्हाला आमचे वैयक्तिक आयुष्य जगू दयावे.
संदीप आणि जेसी हे १२ डिसेंबर २००९ रोजी विवाहबद्ध झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:23 pm

Web Title: another bollywood couple heads for separation
Next Stories
1 १८ वर्षे मोठ्या सहकलाकाराला डेट करतेय ‘ही’ अभिनेत्री
2 राहुल राजने प्रत्युषाचे लाखो रूपये उडवले; प्रत्युषाच्या पालकांचा आरोप
3 ‘कान’साठी रिंगण’, हलाल वक्रतुंड महाकायची निवड
Just Now!
X