News Flash

मलायका-अरबाज खान होणार विभक्त?

सध्या ब्रेक-अप आणि घटस्फोटाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

मलायकाने अरबाजच्या वांद्र्यातील घराला राम राम ठोकला.

बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेक-अप आणि घटस्फोटाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. रणबीर-कतरिना, फरहान अख्तर-अधुना यांनी वेगळे होण्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रिटी जोडी विभक्त होण्याची शक्यता आहे. बॉलीवूड अभिनेता अरबाज खान- मलायका अरोरा हे विभक्त होणार असल्याचे वृत्त आहे. या दोघांमध्ये सध्या बरेच ताणतणाव असून ते विभक्त होणार असल्याते वृत्त स्पॉटबॉय डॉट कॉमने दिले आहे.
१७ वर्षाच्या एकत्र सहवासानंतर ते पहिल्यांदाच वेगळे रहात आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकाने अरबाजच्या वांद्र्यातील घराला राम राम ठोकला असून तिने आपल्या खारमधील घरात राहायला सुरुवात केली आहे. अरबाज आणि मलायका हे दोघेही ‘पॉवर कपल’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत होते, मात्र ब-याच दिवसांपासून मलायका या शोमध्ये दिसलेली नाही. तसेच अरबाजची बहीण अर्पिता हिच्या दुबईतील ‘बेबी शॉवर’साठीही ती उपस्थित नव्हती.
याविषयी अरबाज आणि मलायका यांनी काहीच वक्तव्य केलेले नाही. मात्र, दोघांच्यात काहीच झालेले नसल्याचे मलायकाच्या मॅनेजरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2016 1:18 pm

Web Title: another shocking celeb divorce malaika arora arbaaz khan to split
Next Stories
1 विराट आणि अनुष्काने एकमेकांना इन्स्टाग्रामवर केले ‘अनफॉलो’!
2 हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेण्ड असेच करतात- कंगना
3 पुरुषांची गरज केवळ मुलांना जन्म देण्यासाठी- प्रियांका चोप्रा
Just Now!
X