News Flash

अंशुला म्हणते, ही आहे बोनी कपूरची लाडकी लेक

अंशुला अनेक वेळा खुशी आणि जान्हवीची काळजी घेताना दिसत असते.

अंशुला कपूर

बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावर कपूर कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. मात्र या दु:खद प्रसंगी अर्जुन आणि अंशुलाने बोनी कपूरसह खुशी, जान्हवीला सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही चारही भावंड आता एकत्र वेळ घालवताना दिसत असतात. त्यामुळे बोनी कपूर सध्या आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे.

अंशुला अनेक वेळा खुशी आणि जान्हवीची काळजी घेताना दिसत असते. विशेष म्हणजे काही काळापूर्वी जान्हवीबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या एका युजरला अंशुलाने सोशल मीडियावर खडेबोल सुनावले. त्यामुळे या भावंडांमधील मतभेद मिटल्याच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बोनी कपूरही आता आनंदी असतील यात शंका नाही . मात्र या चारही मुलांपैकी बोनी कपूर यांच्या लाडक्या मुलीचं नाव अंशुलाने जाहीर केलं आहे.


काही दिवासापूर्वी अंशुलाला एका नेटकऱ्याने बोनी कपूर यांची लाडकी लेक कोण असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देत अंशुलाने बोनी कपूर यांच्या लाडक्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. अंशुलाने इन्स्टास्टोरीमध्ये या नावाचा खुलासा केल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘वडीलांना त्यांची प्रत्येक मुलं फेव्हरेटच असतात. तसंच आमच्या वडीलांनाही आम्ही चारही भावंड प्रिय आहोत. मात्र आमची धाकटी बहीण खुशी ही त्यांची फेव्हरेट आहे’, असं अंशुलाने म्हटलं. अंशुलाच्या या उत्तरामुळे बोनी कपूर यांचं धाकट्या मुलीवर जीवापाड प्रेम असल्याचं समजून येत आहे. विशेष म्हणजे खुशी अंशुलाचीही फेव्हरेट असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा अंशुला आणि खुशीचे फोटो व्हायरल होत असतात. तसंच अंशुला अनेक वेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते आणि ती चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य वेळी उत्तरही देत असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 1:44 pm

Web Title: anshula kapoor reveals out of 4 siblings who is boney kapoor most favourite child
Next Stories
1 Video : नोरा फतेहीच्या बेली डान्सला सुष्मिता सेन देतेय टक्कर
2 ‘तुर्रम खान’साठी राजकुमार राव- नुशरत भरुचा आले एकत्र
3 ‘हेमा मालिनी माझी आई असती तर..’
Just Now!
X