व्हॉट्स अॅप हा आपल्यासाठी जणू अविभाज्य भागच झाला आहे. व्हॉट्स अॅपनं पुरवलेल्या फीचर्समुळे आपली कितीतरी कामं सोपी झाली आहेत. आपल्यातील अनेकजण आता व्हॉटसअॅपशिवाय जगण्याचा विचारही करु शकत नाहीत. त्यामुळे आताच्या पिढीसाठी व्हॉट्स अॅप हा जणू जीवनातील अविभाज्य भागच झाला आहे. त्याप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या व्हॉट्स अॅपचं वेड आहे. अनेक वेळा आपले आवडते सेलिब्रिटी व्हॉट्स अॅपवर नक्की कोणाशी किंवा कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर चर्चा करत असतील हे जाणून घेण्याचं चाहत्यांना फार कुतूहल असतं. त्यातच अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने त्यांच्या फॅमिली ग्रुपमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा होते हे सांगितलं.

अंशुलाने काही दिवसापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फॅमिली ग्रुपमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन ते फ्लाइटविषयी चर्चा करत असल्याचं दिसून आलं. तसंच ते एकमेकांना आपल्या फ्लाइटचं लॅण्डिंग कधी होणार हे सांगत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या ग्रुपमध्ये बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर असून त्यांच्यामध्ये ही चर्चा रंगली होती.

 

दरम्यान, काही दिवसापूर्वी अर्जुन आणि जान्हवीने ‘कॉफी विद करण’च्या सेटवर त्यांचा फॅमिली ग्रुप असल्याचं सांगितलं होतं. तसंच या ग्रुपमध्ये त्यांचं नक्की कोणकोणत्या विषयावर चर्चा होते हेदेखील थोडक्यात सांगितलं होतं. त्यामुळेच अंशुलाने मुद्दाम हा स्क्रीन शॉट शेअर करुन घरातल्या प्रत्येक व्यक्तीला टॅग केलं.