News Flash

‘आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही…’, अंशुमन विचारेच्या मुलीचा व्हिडीओ चर्चेत

नेटकरी चिमुकल्या अन्वीच्या या व्हिडीओच्या प्रेमात पडले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याची मुलगी अन्वीचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकताच अन्वीचा असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये अन्वी तिच्या आईशी संवाद साधत ‘मी तुला कधीच म्हातारी होऊ देणार नाही’ असे बोलताना दिसत आहे. नेटकरी चिमुकल्या अन्वीच्या या व्हिडीओच्या प्रेमात पडले आहेत.

अंशुमनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर अन्वीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अन्वी आईसाठी जेवण बनवताना दिसते. दरम्यान मायलेकींचा संवाद सुरु होतो. तू बनलं का माझ्यासाठी जेवण? असे अन्वीची आई तिला विचारते. त्यावर अन्वी हो म्हणते. पुढे तिची आई तिला विचारते, तू माझी काळजी घेणार ना? माझे लाड करणार ना? मी म्हातारी झाल्यावर तू मला सांभाळणार ना? यावर अन्वीने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत.

तू म्हातारी होणार मग मी घाबरणार. पण मी म्हातारीला घाबरते. मी तुला म्हातारी होऊच देणार नाही. कारण तू माझी मम्मा आहेस आणि तू मला सुंदर दिसते असे अन्वीने म्हटले आहे. व्हिडीओमधील अन्वीचे बोबडे बोल अनेकांच्या मनाला स्पर्शून जात आहेत.

अशुंमनच्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 1:37 pm

Web Title: anshuman vichare daughter anvi cute video viral on internet avb 95
Next Stories
1 ‘पठाण’च्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ लीक, किंग खानचे स्टंट व्हायरल
2 ‘रुही’ने केली कोटीत कमाई; तेही पहिल्याच दिवशी!
3 दंगल गर्ल फातिमाचा दमदार डान्स; व्हिडीओ पाहून अनिल कपूर म्हणाले..
Just Now!
X