करोना विषाणूमुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोकांच्या डोक्यावर नोकरी जाण्याचे संकट फिरत आहे. अशा प्रतिकूल परिस्थीतीत करोना विषाणूने देशाचा खुप मोठा फायदा केला असं बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना वाटते.

नेमकं काय म्हणाले अनुभव?

“करोनामुळे देशाचा खुप मोठा फायदा झाला आहे. कारण आपणं भूक, गरीब आणि बेरोजगार यांच्या गोष्टी करत आहोत. करोना आज नाही तर उद्या निघून जाईल परंतु या गोष्टींची चर्चा थांबता कामा नये. आपल्या अर्थव्यवस्थेतील सर्वात पहिला खर्च गरीबांसाठी करायला हवा.” अशा आशयाचे ट्विट अनुभव सिन्हा यांनी केले आहे.

आपल्या देशात जात, धर्म, पंत यांवरुन मोठ्या प्रमाणावर राजकरण केले जाते. परंतु सध्या आपला संपूर्ण देश करोना विषाणूवर चर्चा करत आहे. अर्थव्यवस्थेची हानी आणि बेरोजगारी यांच्या विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर अनुभव यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.