News Flash

सुशांतबद्दल बोलणं अनुभव सिन्हा यांच्या आलं अंगलट; ‘त्या’ विधानावरून झाले ट्रोल

एका यूजरने 'तुमचा नंबर देखील लवकरच येईल' असे म्हणत त्यांना ट्रोल केले आहे

सुशांतबद्दल बोलणं अनुभव सिन्हा यांच्या आलं अंगलट; ‘त्या’ विधानावरून झाले ट्रोल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) तपास सुरु होता. काल एनसीबीने सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली. दरम्यान चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी असे काही ट्वीट केले की त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

अनुभव सिन्हा हे सोशल मीडियावर बिनधास्तपण त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी ‘SSR सीझन २ लवकरच येणार आहे’ या आशयाचे ट्वीट केले होते. सुशांत सिंह राजपूतच्या पुण्यतिथी पूर्वीच अनुभव सिन्हा यांनी केलेले हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्यांचे हे ट्वीट पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा : क्रांती रेडकरच्या पतीचं होतंय सोशल मीडियावर कौतुक, जाणून घ्या कारण

एका यूजरने ‘तुम्हाला का त्रास होत आहे?’ असे म्हणत अनुभव सिन्हा यांना सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही सुशांतच्या मृत्यूची चेष्टा करत आहात का??’ असा प्रश्न अनुभव सिन्हा यांना विचारला आहे. तर आणखी एका यूजरने ‘तुमचा नंबर देखील लवकरच येईल’ असे म्हणत त्यांना ट्रोल केले आहे. अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवली असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्याने नैराश्यात असल्यामुळे इतके टोकाचे पाऊल उचले असल्याचे म्हटले जात होते. आता सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यान एनसीबीने सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 10:59 am

Web Title: anubhav sinha cryptic statment on sushant singh rajput death tweet invites anger avb 95
Next Stories
1 टायगरच्या ‘हीरोपंती २’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार नवाजुद्दीन सिद्दीकी?
2 “जर खरचं मुख्यमंत्री झाली तर…”, हुमा कुरेशीने केला खुलासा
3 विद्यूत जामवालचं नाव ‘जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्ट’मध्ये; शेअर केले फोटोज
Just Now!
X