News Flash

“नेहरुंचे विचार आजही देशासाठी लागू”, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना दिग्दर्शकाचं अभिवादन

बॉलिवूड दिग्दर्शकाने केली स्तुती

संग्रहित छायाचित्र

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जवाहरलाल नेहरु यांना विनम्र अभिवादन केलं आहे. त्यांनी नेहरुंची प्रचंड स्तुती करत त्यांना दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व असं म्हटलं आहे. अनुभव सिन्हा यांनी केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“कधीकधी मला आश्चर्य वाटतं की, भारताच्या मूलभूत पायाभूत सुविधांपैकी कोणती नेहरूंनी उभारलेली अथवा त्यांच्या कल्पनेतून आलेली नाही. त्यांची दृष्टी अजूनही देशाच्या भविष्यासाठी लागू पडते. १९६४मध्ये आजच्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली होती.” अशा आशयाचं ट्विट अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कोण होते पंडित नेहरु?

जवाहरलाल नेहरू देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील एक प्रमुख नेते होते. मोहक व्यक्तिमत्त्व आणि देशासाठी केलेला त्याग या दोन्ही कारणांसाठी ते भारतीय जनतेचे दैवत झाले होते. देश पारतंत्र्यात असताना त्यांनी जवळजवळ नऊ वर्षे ब्रिटिश राजवटीत कारावास भोगला होता. सुरुवातीला स्वातंत्र्यलढय़ातील एक तळपतं व्यक्तिमत्त्व म्हणून आणि नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू हे राष्ट्रभक्तांच्या जवळजवळ दोन पिढय़ांचे हीरो होते. ते अभिजनांचे लाडके होते याचे कारण त्यांच्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाबरोबरच त्यांचं वैचारिक नेतृत्व हेदेखील होतं. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ ही दोन महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:51 pm

Web Title: anubhav sinha jawaharlal nehrus death anniversary mppg 94
Next Stories
1 “प्रियांकाचा तो चित्रपट कंटाळवाणा”; पामेलाने ‘देसी गर्ल’ची उडवली खिल्ली
2 ‘दीपिकाला फूलं देण्यासाठी किती खर्च करतोस’? वडिलांच्या प्रश्नावर रणवीरचं थक्क करणारं उत्तर
3 सोनू सूदला पद्मविभूषण देण्याची मागणी, आपल्या उत्तराने अभिनेत्याने जिंकलं चाहत्यांचं मन
Just Now!
X