‘बिग बॉस’च्या बाराव्या सिझनमध्ये सहभागी झालेले अनुप जलोटा हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अनुप यांनी ‘सत्य साईबाबा’ हा चित्रपट साइन केल्याचे सांगितले होते. आता या चित्रपटातील त्यांचा लूक समोर आला आहे.
नुकताच अनुप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी चित्रपट ‘सत्य साई बाबा’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा अनुप यांचा चित्रपटाली लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुम्हाला माझा लूक कसा वाटला?’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
‘सत्य साई बाबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विकी राणावत यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता अनुप जलोटा यांचा चित्रपटातील लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बख्शी हे कालाकार देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 11:03 am