करोना विषाणूचं संक्रमण अद्याप थांबलेलं नाही. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली. शिवाय लॉकडाउनमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं. हजारो लोक रातोरात बेरोजगार झाले. या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेते अनुपम खेर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ते देशवासीयांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन या आगामी पुस्तकाबाबत चाहत्यांना माहिती दिली. “या महामारीनं आपलं आयुष्य बदलून टाकलं. याक्षणी आपण स्वत:ला ओळखणं गरजेचं आहे. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला सकारात्मक विचारांचं महत्व समजण्याची गरज आहे. मी लॉकडाउनच्या काळात एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून मी देशवासीयांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहे.” अशा आशयाची पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

९० टक्के रुग्ण करोनामुक्त; ८४१ नवे बाधित

मुंबईतील ९० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या केवळ १५,४६६ रुग्ण उपचाराखाली आहेत. गुरुवारी ८४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात १९२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्णवाढीचा दर ०.३५ टक्क्यांपर्यंत खाली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी १९९ दिवसांवर गेला आहे. आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या २,६१,६८४ झाली आहे. त्यापैकी २,३५,२०७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आता केवळ १५,४६६ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ९६१४ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर ५,९६१ रुग्णांना मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत. ९४९ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. मुंबईत दररोज १० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. त्यापैकी बाधित आढळण्याचे प्रमाणही घटत असून सध्या एकूण चाचण्यांपैकी १० टक्क्यांपेक्षाही कमी अहवाल बाधित येत आहेत.