पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे भाषण ऐकून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

अवश्य वाचा – “ते १५ लाख एकत्र करुन हे पॅकेज बनवलं”; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

“जेव्हा नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा देशच नाही तर संपूर्ण जग त्यांना ऐकण्यासाठी सज्ज होतं. त्यांच्या भाषणातून प्रेरणा मिळते. १३० कोटी भारतीय जेव्हा आत्मनिर्भरतेचं भांडवल घेऊन एकत्र येतील तेव्हा आपल्या कोणीही थांबवू शकणार नाही. यश आपल्याला निश्चित मिळेल. २०,००,००० कोटी असे दिसतात. २०००००००००००००! गणित तर ठिक आहे ना?” अशा आशयाचं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.