बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार किरण खैर सध्या ब्लड कॅन्सरविरोधात लढा देतायत. गेल्या वर्षी नोव्हेंबर माहिन्यात किरण खेर यांना या आजाराबाबत कळालं. त्यांना मल्टीपल मायलोमा नावाचा कॅन्सर आहे. सध्या अनुभवी आणि मोठ्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतंच त्यांचे पती अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या तब्बेतीबाबत अपडेट दिलीय. अभिनेते अनुपम खेर हे नुकतेच इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले होते.

इन्स्टाग्रामवर लाईव्ह असताना एका फॅनने अनुपम यांना किरण खेर यांच्या तब्बेतीबाबत विचारलं. ” किरण यांची तब्बेत आता आधीपेक्षा उत्तम आहे..तिच्या तब्बेतीत आता सुधार होतोय…परंतू तिला जे औषधं सुरू केली आहेत त्याचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत..ती औषधं खूप स्ट्रॉन्ग आहेत…आणि आशा आहे की ती यातून लवकर बरी होईल…तुमच्या प्रार्थना तिच्या पाठीशी आहेत..मला खात्री आहे ती लवकर बरी होईल”, असं उत्तर अनुपम खेर यांनी दिलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

सोबतच अनुपम खेर यांनी करोनाची पहिली लस घेतली असून आता दुसरी लस येत्या मे मध्ये घेणार असल्याचंही या व्हिडीओमध्ये सांगितलं. सध्या करोना काळातला हाहाकार पाहता एकदा डॉक्टरांसोबत लाईव्ह येऊन लाईन्ह सेशन करण्याची इच्छा देखील यावेळी अनुपम खेर यांनी व्यक्त केली, जेणेकरून लोकांमध्ये करोनाबाबत जागरूकता वाढेल.

किरण खेर यांच्यासाठी सोडला अमेरिकेचा शो
किरण खेर यांच्यावर कोसळलेल्या संकट काळात त्यांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून नुकतंच अभिनेता अनुपम खेर यांनी अमेरिकन टीवी चॅनलचा एनबीसीचा सीरीज न्यू एमस्टरडम या शोसाठी नकार दिला. सध्या ते पत्नी किरण खेर यांच्या तब्बेतीला प्राथमिकता देताना दिसून येत आहेत. अमेरिकेचा शो सोडून त्यांनी पत्नी किरण यांची काळजी घेत त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय.