बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. अनुपम खेर यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,’राम लखन’,’खेल’, ‘डर’ अशा अनेक चित्रपटांची नावं यामध्ये आहेत. सुभाष घई यांच्या १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कर्मा’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘डॉ.डँग’ ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती.

या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्राम खात्यावरून शेअर करत अनुपम खेर यांनी म्हटले म्हटले आहे की, ‘डॉ.डँग व राणा विश्वप्रताप सिंग यांच्या भेटीचा प्रसंग. सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटाच्या शूटिंगचा माझा हा पहिला दिवस होता. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. उत्सुकतेसोबत दडपणही होतं. त्यांनी मला, “शांत हो. हा फक्त अभिनय आहे.” असं सांगितलं. पण तरीही मी शांत झालो नाही. पण, सीन झाल्यानंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मला खूप छान वाटलं. त्यांच्यासारखा उत्कृष्ट अभिनेता होणे नाही.”

सध्या अनुपम खेर ‘वन डे : जस्टिस डिलिव्हर’ या चित्रपटात दिसणार आहेत. २८ जून २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.