19 October 2019

News Flash

Video : चित्रपट पाहून अनुपम खेर यांची आई म्हणते, शरीफ था वो बेचारा

या चित्रपटाला अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांनी १०० पैकी १०० गुण दिले आहेत.

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट प्रदर्शित झाला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या सर्व प्रतिक्रियांमध्ये अनुपम खेर यांना आपल्या आईनं दिलेली प्रतिक्रिया सर्वाधिक भावली. त्यांनी याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या चित्रपटाला अनुपम खेर यांच्या आई दुलारी यांनी १०० पैकी १०० गुण दिले आहेत. तसेच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेबद्दल आपला अभिप्रायही व्यक्त केला. ‘ मेकअपनंतर अनुपमला मी ओळखलं नाही. हा चित्रपट मला खूपच आवडला. इतकंच नाही मला मनमोहन सिंग देखील खूप आवडले असं त्या म्हणाल्या.  ‘मुझे मनमोहन सिंह बहुत पसंद है. ऐसा शरीफ था बेचारा. लगता था दूर से शरीफ है, तभी लोग शरीफ को बेवकूफ मानते हैं. ये नहीं पता वो बहुत तेज होते हैं’ असं म्हणत या दुलारी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट याच नावानं प्रकाशित झालेल्या संजय बारू यांच्या वादग्रस्त कांदबरीवर आधारित आहे. संजय बारू हे मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते.

First Published on January 11, 2019 5:43 pm

Web Title: anupam kher mother on manmohan singh and the accidental prime minister