News Flash

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी महेश भट्ट यांच्याबद्दल अनुपम खेर म्हणाले, “मी आंधळा नाही पण..”

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी दिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून वादंग सुरु झाला. यामध्ये अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची नावं समोर आली. निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावरही अनेक आरोप केले गेले. महेश भट्ट व अभिनेत्री रिया चक्रवर्ती एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे यावरूनही काही प्रश्न उपस्थित केले गेले. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी महेश भट्ट यांचा जबाबसुद्धा नोंदवून घेतला. या प्रकरणात महेश भट्ट यांचं नाव समोर येण्यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, “त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जोपर्यंत ते माझ्याजवळ येऊन काही बोलत नाहीत किंवा जोपर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ इच्छितो. मी आंधळा नाहीये पण आता मी काही बोलणार नाही. जे हात तुमची मदत करतात त्या हातांना कधी कापू नका अशी शिकवण मला माझ्या आईवडिलांनी दिली आहे. त्यामुळे मी कायम महेश भट्ट यांचा ऋणी आहे.”

दुसरीकडे महेश भट्ट व त्यांची मुलगी आलिया भट्ट यांच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढत आहे. महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक २’ या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्यूबवर लाइक्सपेक्षा डिसलाइकच फार मिळाले आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 8:34 pm

Web Title: anupam kher on mahesh bhatt name being taken in sushant case ssv 92
Next Stories
1 अंशुमनच्या संगीतमय प्रवासाला सुरुवात
2 दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ
3 दिग्दर्शक केदार शिंदे आणणार ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’चा पुढचा पार्ट?
Just Now!
X