जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील काश्मिरी पंडित सरपंचाच्या हत्येप्रकरणी अभिनेते अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी राग व्यक्त केला आहे. या हत्येप्रकरणावर बुद्धिजीवी लोकांचं मौन का आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“अनंतनागमध्ये झालेल्या काश्मिरी पंडित सरपंचाच्या हत्येने मी फार दु:खी आहे. या घटनेचा मला संतापही येतोय. भर रस्त्यात त्यांच्यावर गोळी झाडली. १९ जानेवारी १९९० रोजी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. काश्मीरमध्ये भरदिवस असे अनेक लोक मरतात असं किमान आता म्हणू नका. इतकी मोठी घटना होते आणि यावर कोणीच व्यक्त होत नाही, याचं फार आश्चर्य वाटतंय”, असं ते या व्हिडीओत म्हणत आहेत.
Deeply saddened & angry at the merciless killing of the lone #KashmiriPandit sarpanch #AjayPandita in Anantnag yesterday. My heartfelt condolences to his family. There is an obvious silence from the usual suspects who cry their heart hoarse otherwise. #JusticeForAjayPandita pic.twitter.com/5TnLpABOh2
— Anupam Kher (@AnupamPKher) June 9, 2020
अनुपम खेर नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर मुक्तपणे व्यक्त होताना दिसतात. ते स्वत: काश्मिरी पंडित आहेत. काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर त्यांनी अनेकदा भाष्य केलंय. १९ जानेवारी १९९० हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण त्या दिवशी काश्मिरी पंडितांना खोरे सोडून बाहेर जावे लागले होते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय, असं म्हणत त्यांनी मौन बाळगणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 10:58 am